rkT;k ckrE;k A
आपला सहभाग हवाय!
‘नवनाथ पब्लिकेशन’ या कंपनीने दैनिक ‘शोषितांचे समर्थन’ आणि साप्ताहिक ‘समर्थन’ या दोन वर्तमानपत्रांमधून अल्पावधीत सामान्य जनतेचा विश्‍वास संपादित करण्यात यश मिळविले आहे; परंतु प्रस्थापित जुन्या गैर बाबी मोडीत काढण्यासाठी केव्हाही वर्तमानपत्रांच्या वैचारिक चळवळींना लोकसहभाग असणे अत्यावश्यक आहे अन्यथा वर्तमानपत्रांची चळवळ निरर्थक ठरते. अन्याय, अत्याचारग्रस्तांना मदत ठरणरी, राजकीय प्रस्थापित गैरबाबींना रोखण्यासाठी लोकांची ताकद ठरणारी वर्तमानपत्रांची खरी बाजू यशस्वी मांडायची असेल तर वर्तमानपत्रातून प्रत्येक घटकांची खरी भूमिका, त्यांची अडचण जनतेसमोर जशीच्या तशीच येणे अपेक्षित आहे. केवळ बातमी नव्हे तर समाजाच्या हुंकारांचे प्रतिबिंब वर्तमानपत्रातून जनतेसमोर ठेवण्याचा यापुढे प्रयत्न अधिक सक्षमतेने करण्याचा आम्हा सर्वांच सुरू आहेत. वेबसाईट आणि प्रत्यक्ष वितरण यामुळे वर्तमानपत्र अल्पकाळात आपल्यापर्यंत पोहोचत आहे; परंतु त्याच वर्तमानपत्रातून आपले विचार सातत्याने पुढे येणे अपेक्षित आहे. परिवर्तनासाठी आपल्या चांगल्या विचारांची, आपण सुचविलेल्या चांगल्या मार्गांची उपलब्धी सर्वांसाठी असली पाहिजे. त्यासाठी आपण आणि वर्तमानपत्र या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत, असा आपल्यातील समज दूर होणे प्रथम गरजेचे आहे. आपल्यासाठी ‘नवनाथ पब्लिकेशन’ने ‘समर्थन’ परिवर्तन मंच’ नावाने स्वतंत्र व्यासपीठ तयार करीत आहे. यामध्ये समाजातील विविध घटनांबाबत, घडामोडींबाबत सर्वच घटकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आपल्या प्रतिक्रिया, मनोगत जसेच्या तसे प्रसिद्ध होणार आहे.

वर्तमानपत्र बातमी म्हणून प्रत्येक घटना आपल्यासमोर ठेवते; परंतु समाजमनाला चांगल्या परिवर्तनासाठी प्रवृत्त करण्यासाठी आपल्या विचारांचा सहभाग वर्तमानपत्रांच्या चळवळी महत्त्व वाढविणारे आहे. जेवढी आपली वैचारिक चळवळ प्रगल्भ असेल तेवढेच समाजमन सक्षम होईल आणि त्यातून समाजात होणारे परिवर्तन चांगले आशावादी आणि टिकावू ठरणार आहे. एकूणच यापुढे वेगवगळ्या विषयावर वर्तमानपत्र आता आपली मते जनतेपर्यंत पोहोचवू इच्छित आहे. बस, आपण आपला अमूल्य वेळ देऊन वेगवेगळ्या विषयावर यापुढे वेळोवेळी आपली मते न चुकता कळवा आणि जनतेसाठी जनतेच्या लोकशाहीच्या चळवळीत आपण सहभागी होण्यास ‘समर्थन परिवर्तन मंचा’च्या माध्यमातून आपले विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव सहकार्य असावे.

आपला स्नेहांकित,

नवनाथ गुणाजी गुरव
(संपादक)